भाजपा द्वारे ग्रामपंचायत सरपंच, सदस्यांचा सत्कार कार्यक्रम | Gram Panchayat Sarpanch, Members felicitation program by BJP. | The Current Scenario
भाजपा द्वारे ग्रामपंचायत सरपंच, सदस्यांचा सत्कार कार्यक्रम | Gram Panchayat Sarpanch, Members felicitation program by BJP. | The Current Scenario
- अकोला– ग्रामविकाससाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तसेच राज्यातील भाजप महायुती सरकारने अनेक योजना सुरू केल्या असून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी सरकार ने केलेल्या योजनांचा लाभ सर्व सामन्यांन पर्यंत पोहोचवण्यासाठी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन भाजप प्रदेश सरचिटणीस आ.रणधीर सावरकर यांनी केले.स्थानिक स्वर्गीय बाळासाहेब टोपले सभागृह भाजप कार्यालयं येथे नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच ग्राम पंचायत सदस्य यांचा सत्कार समारंभात ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी भाजप जिल्हाध्यक्ष किशोर मांगते पाटील हे होते तर मंचावर विजय अग्रवाल,बळीराम सिरस्कर,भाजप महानगर अध्यक्ष जयंत मासने,सहकार आघाडी प्रमुख राजेश बेले,सचिव अंबादास उमाळे,तेजरव थोरात,माधव मानकर,बाळासाहेब आपोतिकर मंचावर उपस्थित होते.
- यावेळी जनसंघ ते भाजपा काम करणाऱ्या वेणूताई उमाळे कापशी रोड सरपंच,पुजताई वाघमारे मारोडी सरपंच,राजेश बेले एकलार सरपंच,आशिष कासमपुरे काटी पाटी सरपंच,दीपक खोडके सहित ३० ग्रामपंचायत सदस्यांना सत्कार करण्यात आला.यावेळी आ.रणधीर भाऊ सावरकर यांनी शेतकरी व समाजातील सर्व घटकांच्या साठी भारतीय जनता पार्टी केंद्र सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार कार्यरत असून ८० कोटी जनतेला ०५ वर्ष मोफत धान्य देण्याचा ऐतिहासिक जागतिक निर्णय घेऊन विक्रम केला आहे या आधी सुद्धा अडीच वर्ष मोफत धान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने देऊन सर्व समण्यायना आधार देण्याचे काम केले आहे.शेतकरी व ओबीसी आणि समाजातील वंचित पीडितांना आधार देण्याचं काम ते करून त्यांच्या नावाचं राजकारण न करता सातत्याने सामाजिक भौगोलिक आर्थिक सर्वांगीण विकास करण्याचे संकल्प घेऊन कार्यरत असल्याचे सावरकर यांनी सांगून व राज्यातील एकनाथ शिंदे,देवेंद्र फडणवीस,अजित पवार यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार मूलभूत सुविधा व शीघ्र गती ने विकास करण्याच्या संकल्प केला आहे.यावेळी जिल्हा भाजप अध्यक्ष किशोर मांगते पाटील यांनी राज्यसरकार आणि भाजप लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या विकास कामाची विश्लेषण माहिती दिली तर बळीराम सिरास्कर विजय अग्रवाल यानीची समोयाचीत भाषणे झाली.
- कार्यक्रमाचे संचलन गिरीश जोशी यांनी केले तर प्रास्ताविक माधव मानकर तर आभार प्रदर्शन अंबादास उमाळे यांनी केले.
Visit Us :- The Current Scenario⚓
Youtube Channel :- TCS 24 News📺