आष्टी पोलिसांनी ७० गुन्ह्यातील “वांटेड” आणि दोन मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या
बीड जिल्ह्यातील आष्टी पोलीसांची धडाकेबाज कामगिरी
आष्टी – महाराष्ट्रातील अहमदनगर, औरंगाबाद, सातारा, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यातील ७० गंभीर गुन्ह्यातील “वॉन्टेड” असलेल्या आणि २ मोक्का गुन्ह्यातील तील फरार असलेल्या अटल गुन्हेगारांच्या टोळीला आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष खेळ माळस यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा घालण्याच्या तयारीत असतानाच आष्टी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून तीन गुन्हेगारांच्या मुस्क्या आवडल्या असून या झटापटीत अंधाराचा फायदा घेऊन दोन गुन्हेगार पळून जाण्यात यशस्वी झाले आष्टी पोलिसांच्या या धाडसी कामगिरीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे…
याबाबतची सविस्तर हकीकत अशी की दिनांक १३ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास पोलीस स्टेशन येथे हजर असलेले पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस. यांना एका गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की,
शिराळ परिसरातील एका धाब्या शेजारी शेतामध्ये दरोडेखोर दरोडा घालण्याच्या तयारीत आहेत अशी बातमी मिळाल्यानंतर सतर्क झालेल्या पोलीस निरीक्षकांनी आपले सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय देशमुख. साहेब पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी. पोलीस उपनिरीक्षक नामदेव धनवडे. या तीन प्रमुख अधिकाऱ्यांचे तीन पथके तयार करून समजलेल्या ठिकाण च्या दिशेने कूच केले पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी हे कर्मचाऱ्यांसह खाजगी वाहनाने धिरडी मार्गे शिराळ कडे दुसरे पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय देशमुख हे आष्टी शिराळ मार्गे तिसरे पथक पोलीस उपनिरीक्षक नामदेव धनवडे. यांचे पथक फत्तेवडगाव मार्गे सरकारी वाहनाने या तीन पथकातील कर्मचाऱ्यांनी शेरी फाटा ते शिराळ या रस्त्यावरील शिराळ परिसरामध्ये एका धाब्याच्या मागे शेतात दरोडा घालण्याच्या तयारीने दबा धरून बसलेले असल्याने या धाब्याच्या मागील बाजूला रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास शेतात चारही बाजूने या तीनही पथकातील कर्मचाऱ्यांनी छापा मारला असता त्या ठिकाणी “आटल्या उर्फ अटल उर्फ अतुल ईश्वर भोसले”. रा.बेलगाव, ता.कर्जत, जि. अहमदनगर. “युवराज उर्फ धोंड्या उर्फ धोंडीराम ईश्वर भोसले”. रा.बेलगाव, ता.कर्जत जि. अहमदनगर. आणि “होमराज उर्फ होम्या उद्धव काळे”. रा.वाकी, ता.आष्टी, जि. बीड. यांना या पोलीस कर्मचाऱ्यांनी धाडस करून जीव धोक्यात घालून पकडले…
त्यावेळी “आटल्या भोसले”. याच्याकडे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस “युवराज उर्फ धोंड्या” याच्या कमरेच्या मागे लावलेला कोयता आणि “होमराज काळे”. याच्याकडे धारदार सुरा असल्याचे दिसून आले या घरपकडीमध्ये अंधाराचा फायदा घेऊन “संदीप ईश्वर भोसले”. रा.बेलगाव, ता.कर्जत, जि. अहमदनगर. आणि श्याम नवनाथ काळे. रा. वाकी. ता.आष्टी. हे फरार होण्यात यशस्वी झाले या ठिकाणी काळ्या रंगाची टीव्हीएस रायडर, काळ्यारंगाची युनिकॉर्न, आणि ग्रे रंगाची युनिकॉर्न, अशा ३ मोटरसायकली घटनास्थळावरून… पोलिसांनी जप्त केल्या दरोडेखोरांच्या या मस्क्या आवळण्याचा थरार सुमारे अर्धा ते पाऊण तास चालला पोलीस कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांसमवेत अत्यंत धाडसाने ही कामगिरी केली आहे.
या तीनही पथकामध्ये पोलीस हवालदार अनिल सुंबरे, पोलीस नाईक. दराडे. पोलीस शिपाई सचिन पवळ. पोलीस शिपाई मझहर शेख. पोलीस शिपाई शेख. शिपाई गायकवाड. चालक पोलीस हवालदार उदावंत. तसेच आष्टी येथे आलेल्या कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्यासाठी आलेल्या दंगल नियंत्रण पथकातील अमलदार पोलीस शिपाई पटाईत पोलीस शिपाई राऊत. पोलीस शिपाई आडे. पोलीस शिपाई वनवे. पोलीस शिपाई वडमारे. शिपाई यांनी या कारवाईमध्ये सहभाग नोंदवला यावेळी झालेल्या झटापटीमध्ये पोलीस कर्मचारी भोजे. यांच्या पायाला दुखापत झाली आहे या गुन्ह्याबाबत आष्टी पोलीस स्टेशन येथे भादवि. 399, 402, 353, 332 सह शस्त्रास्त्र कायदा 3/25, 4/25 अन्वये गुन्हा दाखल झाला असून फरार आरोपींच्या शोधासाठी प्रयत्न सुरू आहेत…
या प्रकरणी फिर्याद सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांनी दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळ. हे करत आहेत.